Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा : आत्महत्या हा पर्याय नव्हे!

Share

(दम्या, गण्या, तान्या, भग्या अन काही शहाणी मंडळी बसलेली )

दाम्या : अय पोराओ झाला का नाय मुख्यमंत्री … ?
गण्या : मुख्यमंत्री व्हय ..न्हाय झाला अजून…
तान्या : आता म्हण राष्ट्रपती राजवट लागली हाय राज्यात ..मुख्यमंत्री नव्ह राज्यपाल कारभार पाहत्यात आता ..

गण्या : व्हय तर .. अजून दोन महिने राज्यपाल राहणार आहेत म्हणं…
भग्या : मी जाऊ का? न्हाय म्हणलं तुमचं राजकारणपुराण झालं असलं तर
गण्या : काय झालं भगवान ?
भग्या : अर काय झालं म्हणून काय इचारतोय ..राज्याची पडलीय यांना … गावाकडं कुणाचीच नजर न्हाय..
तान्या : सांगशील तर खरं… ?

भग्या : तानाजी काका ? तुम्हाला म्हाईत न्हाय व्हय.. अवं त्या खालच्या आळीच्या सुक्यानं फवारणीचा औषध प्याल म्हण ?
तान्या : व्हयं खरं .. येळीच पाटील गेलं नसतं तर सुक्या आपल्यातून गेला असता.. शेतकरी पुरता मराया टेकलाय पर राजकारण्यांना त्याच काही सोयरसुतक न्हाय.. (तेवढ्यात पाटलाच्या तुक्या तिथे येतो.. )

पाटलाच्या तुक्या : अगदी खरं बोललास बघ तान्या .. पिकावाणीचं शेतकऱ्याची जिंदगी बी कवडीमोल हाय.. अर एका वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पर त्याच कुणालाच काही न्हाय..
दाम्या : पाटील पर, शेतकरी आत्महत्येवर सरकारच्या काहीच उपाययोजना नाहीत का?

पाटलाच्या तुक्या : शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर लाखो रुपये देण्याचे आश्वासन दिली जातात. पर ते आश्वासनापुरतेच मर्यादित राहते. माझं म्हणणं असं आहे कि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये… जमिनीला पाझर फोडण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये असते. अन हाच शेतकरी बायका पोरांना वाऱ्यावर सोडून आपलं जीवन संपवतो..

तान्या : पर तात्या निसर्गापुढं कोणाचं काय चालतं ?
पाटलाच्या तुक्या : अर ओला दुष्काळ, सुका दुष्काळ हे निसर्गावर अवलंबून हाय.. माणूसच याला कारणीभूत हाय… संकटे येत्यात पण धीर कशाला सोडाया पाहिजे.. पर आपण लेकराबाळांना सोडून गेल्यावर त्यांनी कुणाकडं पाहावं.. याचा विचारही शेतकऱ्याला शिवत नाही काहो ….
गण्या : राज्यात मराठवाड्यात खूपच आत्महत्या होत्यात.. दुष्काळाच्या झळाही त्यांना अधिक सोसाव्या लागत्यात.. पर आत्महत्या हा पर्याय नाही..
पाटलाच्या तुक्या : अगदी मनातलं बोललास .. माणसाने मानसिक दृष्ट्या सुदृढ असायला हवं. जेणेकरून परिस्थितीशी सामना करण्याचे धाडस माणसाला प्राप्त होते. पर आजचा माणूस शारीरिक दृष्ट्या सक्षम असला तरी मानसिक दृष्ट्या सक्षम असेल का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे कोणतेही टोकाचं पाउल उचलण्याआधी माणसाने कुटुंबाचा, स्वतःचा विचार करावा …(क्रमश: )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!