Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video : महिला, मुलींना सुरक्षेचा विश्वास : पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह

Share

महिलांच्या सक्षमिकरणाबरोबरच मुलींना शाळा, महाविद्यालयासह समाजात वावरताना सुरक्षेबाबत विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असेल. हे करतानाच अधिकाधीक गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. असे झाले तर पुढच्यास धडा मिळून ते गुन्हा करण्यापासून परावृत्त होतील. शास्त्रशुद्ध पद्धतीने गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहचवण्यावर आमचा भर असल्याचे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्पष्ट केले. देशदूतला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी संवाद साधत एक स्त्रीरोग तज्ञ ते आयपीएस अधिकारी हा प्रवास उलगडला. देशदूतचे संचालक जनक सारडा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

स्त्रीरोगतज्ञ ते आयपीएस अधिकारी हा प्रवास

स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत असताना बाळंंतपणासाठी आलेल्या महिलांना मुलगी झाली तर संपुर्ण कुटुंबियांचे बदलेली वागणुक, त्यांना झालेले दुख रोज अनुभवत होते. महिला बाळंत झाल्यानंतर पहिला प्रश्न मुलगा झाला की, मुलगी असा असे, एक डॉक्टर असूनही हे रोखू शकत नसल्याने यातूनच महिलांच्या सामाजिक स्थितीबाबत ठोस काही करण्यासाठी आयपीएसचा अभ्यास सुरू केला आणि सर्व पोस्टिसंगच्या ठिकाणी पहिली महिला अधिकारी म्हणुन काम करत आहे.

महिला अधिकारी म्हणून महिलांसाठी ठोस उपक्रम

सुशिक्षीत समाजातही मोठ्या प्रमाणात मुलगा- मुलगी असा भेदभाव पाहायला मिळत आहे. जे संस्कार मुलांवर होतात त्याप्रमाणेच पुढे जाऊन ते समाजात वागतात. यामुळे परिवर्तनाची सुरूवात घरापासूनच झाली पाहिजे. तीच्या सुरक्षेबाबत आयुष्यभर चिंता व्यक्त केली जाते. हे बदलण्याची गरज असून यामध्ये पोलीस म्हणून आम्ही मोठे योगदान देत आहोत. प्रत्येक कुटुंबाला त्यांची मुलगी शिक्षण घेताना, समाजात वावरताना सुरक्षीत आहे याचा विश्वास आम्ही जनतागृती करून देत आहोत. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये दामिनी पथके कार्यरत असून शाळा, विद्यालये भरताना व सुटताना टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे. तसेच महिला व मुलींच्या तक्रारंवर तात्काळ कारवाई केली जात आहे.

नक्षली भागात काम करण्याचा अनुभव

माझी पहिली पोस्टींग गडचिरोली येथे झाली. अर्थात ती मी मागुन घेतली होती. पहिली महिला अधिकारी म्हणून मी तेथे कार्यरत झाले. परंतु याबाबत खात्यातील लोकांनाही आश्चर्य वाटे. या परिस्थितीत मला स्वतःला सिद्ध करणे आवश्यक होते. म्हणून हे आव्हान पेलले. नेमके याच कालावधीत 2009 ला लोकसभा तसेच विधानसा निवडणुका होत्या.

यास नक्षलवाद्यांचा विरोध होता. यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले होते. अति सुक्ष्मनियोजन करून नक्षलींचे संभाव्य हल्ले होऊच दिले नाहीत आणि दुसरीकडे मतदारांना सुरक्षेची हमी देत त्यांना मतदानासाठी प्रवृत्त केले. यामुळे त्यावेळी मागीलपेक्षा सर्वात चांगले मतदान झाले. परिणामी मला राज्याचे खडतर सेवा तर केंद्राचे आंतरीक सुरक्षा पदक प्रदान करण्यात आले. मी स्वतला सिद्ध केले यामुळे आता कोणी म्हणु शकणार नाही की, महिला हे करू शकत नाहीत.

नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेचा संपूर्ण व्हिडीओ

मुरमाडी प्रकरण : कठीण परिक्षा

दिल्ली येथे 2012 ला निर्भया प्रकरण घडले. तर बरोबर एक महिन्याने भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथे एक प्रकरण घडले. ज्यामध्ये तीन अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आले होते व हे निर्भयाप्रमाणेच असल्याचा दावा केला जात होता. यामुळे या प्रकरणाकडे आंतरराष्ट्रीय लक्ष होते. याच्या बातम्या स्थानिकसह आंतराराष्ट्रीय मिडिया कव्हर करत होते. या सर्वाचा प्रचंड दबाव पोलीसांवर होता. एकिकडे कायदा सुव्यवस्था राखणे व दुसरीकडे या प्रकरणाचा योग्य तपास करणे, अशा वातावरणात खुप संयमाने हे प्रकरण हाताळले. शास्त्रीय पुरावे उपलब्ध करून हे प्रकरण निर्भया प्रमाणे नाही हे दाखवून दिले. तर यातील दोषींना अटक करून शिक्षेपर्यंत पोहचवले. हे प्रकरण आपल्यासाठी खुप आव्हानात्मक होते.

नागपूर, नाशिकचा अनुभव

नागपूरचा संत्रे तर नाशिकचे द्राक्ष या दोन्हीमध्ये शेतकर्‍यांची फसवणुक हे साम्य आहे. शेतकर्‍यांचा विश्वास व परिस्थितीचा गैर फायदा घेऊन व्यापारी लाखो रूपयांची फसवणुक करतात. यावर लक्ष केेंद्रीत केले असून शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करत आहोत. अनेक पळून गेलेले व्यापारी पकडून आणुन शेतकर्‍यांना त्यांचे पैसे परत मिळवुन देण्यात मदत केली आहे. आता कोणत्याही व्यापार्‍याशी व्यवहार करण्यापुर्वी शेतकर्‍यांनी व्यापार्‍याची माहिती पोलीसांना देऊन त्याची पाडताळणी करून घ्यावी. पोलीस त्या व्यापार्‍याचा इतिहास जाणुन घेऊन वास्तव दाखवतील. तसेच व्यवहार करण्यापुर्वी त्या व्यापार्‍याचे आधारकार्ड, बँकपुस्तकाची झेरॉक्स पोलीसांना द्यावी यामुळे शेतकर्‍यांना सुरक्षेची हमी मिळेल.

विधानसभा निवडणुकांची तयारी

थोड्या कालावधीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापुर्वीच आम्ही लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. हा अनुभव पाठिशी असल्याने जिल्ह्यातील संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, ठिकाणे याची माहिती झाली आहे. त्रासदायक ठरणारांवर आगोदरच कारवाया सुरू करण्यात येणार आहेत. प्रमाख्याने युवकांमध्ये सेल्फी क्रेझ आहे. परंतु मतदान केद्रात मत करतानाची सेल्फी काढल्याने आम्हाला गुन्हा दाखल करावा लागला आहे. याबाबत युवकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तर आमच्या कर्मचार्‍यांच्या सुविधांंकडे कल असणार आहे. मतदान काळात त्यांना चौदा – पंधरा तास काम करावे लागते. त्यांचा त्रास कमी करून सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न असेल.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर ठोस उपायोजना

जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही विविध उपायोजना राबवल्या आहेत. अनेक गुंड, टोळ्यांविरोधात मोक्का, एमपीआयडी, तडीपारी अशा कारवाया सातत्याने सुरू आहेत. गुन्हेगारी रोखण्याचे प्रमुख अस्त्र हे शिक्षा आहे. यामुळे आम्ही गुन्हे शोध व सिद्धतेवर सर्वाधिक भर दिला आहे. गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोहचवल्यास पुढचे आपोआप धडा घेऊन गुन्हा करण्यापासून परावृत्त होत आहेत. तुरूंगातून सुटलेल्या गुन्हेगाराचे समुपदेशन करून तो पुन्हा तसेच गुन्हे कराणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. या सर्वाच्या परिणामी जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!