Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

लवकरच टेस्लाची चार्जिंगवर चालणारी कार बाजारात दाखल

Share

नाशिक : इलेक्रॉनिक गाड्या बनवणाऱ्या टेस्लाने आपली नवीन एसयूवी मॉडेल वाय ही गाडी बाजारात लवकरच येईल असे बोलले जात आहे. या कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी या संदर्भात थोडीशी माहिती दिली आहे. टेस्ला मॉडेल वाय याचे लॉन्ग रेंज व्हर्जन हे मॉडेल बाजारात ग्राहकांना खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहे. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर ती साधारणपणे ४८२ किलोमीटर अंतर कापू शकेल.

या गाडीची किंमत ३२ लाख ४१ हजार इतकी आहे. टेस्ला मॉडेल वायचे स्टँडर्ड व्हर्जन २०२१ मध्ये बाजारात उपलब्ध आहे .याची किंमत २६ लाख ९० हजार इतकी आहे. हे व्हर्जन पुन्हा चार्ज केल्यानंतर ही गाडी ३७० किलोमीटर अंतर पार करू शकेल. टेस्लाची नवीन गाडी एसयूवीत एकूण ७ जण आरामात बसून प्रवास करू शकतात. ज्या ग्राहकांना ही गाडी खरेदी करायची असेल तर, त्यांना किमान २ लाख रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. या गाडीचा वेग २०९ किलोमीटर प्रतितास इतका आहे, असा कंपनीने दावा केला आहे.

ही गाडी ५.५ सेकंदात किमान ०-९६ किलोमीटर प्रतितास धावू शकते. २०२० मध्ये एसयूवीच्या लॉन्ग रेंज व्हर्जनची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. सुरुवातीला गाडी अमेरिकेच्या बाजारात दाखल होणार आहे. भारतात ही गाडी लवकरच रस्त्यावरून धावताना दिसण्याची शक्यता आहे. असे मत एलन मस्क यांनी स्पष्ट केले आहे. भारतात या गाडीची किंमत साधारणपणे ३५-५५ लाख इतकी असणार आहे. ही एक स्पोर्ट्स कार आहे.

या सर्व गाड्या फक्त इलेक्ट्रिकवर चालतात. कोणत्याही गाडीची ऊर्जा ही केवळ त्यात असलेल्या बॅटरीशी संबंधित असेलच असे नाही. उच्च दर्जाच्या विद्युत गाड्या बनवणारी तसेच सिलिकॉन व्हेलीशी संबंधित कंपनी आहे. ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तिची स्थापना २००३ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे करण्यात आली.

टेस्ला कार संदर्भात १० महत्वपूर्ण गोष्टी
१ गाडीला इंजिन नाही
२ गाडीचा आकार बदलल्यास मायलेज वाढते
३ टेस्ला गाडीच्या ऍपवर गाडीचे सर्व डिटेल्स उपलब्ध आहेत.
४ गाडीच्या लोकेशन या बटणावर क्लिक केल्यास आपली गाडी कोठे कोणत्या दिशेने चालली आहे ते कळते.
५ भविष्यात ही गाडी पुण्याहून मुंबईला विनाड्राइवर जाईल असा कंपनीचा दावा आहे.
६ मोबाईलवरून आपण गाडीच्या ऍप मदतीने तापमानावर नियंत्रण आणू शकतो.
७ उन्हाळ्यात गर्मीमुळे गाडी थंड ठेऊ शकतो तर, हिवाळ्यात आपण गाडी वॉक करू शकतो.
८ गाडीच्या आतमध्ये केवळ दोन बटणे उपलब्ध आहेत.
९ गाडी इंटरनेटशी जोडलेली असल्यामुळे आपण विविध संकेतस्थळांवर भेट देणे, गेम्स तसेच गाणी ऐकू शकतो
१० या गाडीत पेट्रोल डिझेल आपण टाकू शकत नाही

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!