Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

स्मार्टरोड मुळे ऐन दिवाळीत व्यापारीवर्गाचा कडकडीत बंद

Share

नाशिक : स्मार्टरोडच्या कामामुळे अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका व एमजी रोड परिसरातील व्यापारावर विपरीत परिणाम होत असल्याने येथील व्यापारी आज दुपारी ३ ते पाच वाजेदरम्यान कडकडीत बंद पाळणार आहेत.

दरम्यान गेल्या काही महिनयांपासून स्मार्टरोडचे काम सुरु आहे. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या दरम्यान एक किमीचा हा मार्ग असून तो पूर्ण होत आला आहे. परंतु मेहेर सिग्नल दरम्यान दुरुस्तीचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असल्याने एमजी रोड तेअशोकस्तंभ परिसरात वाहतूक कोंडी होते.

परिणामी येथील व्यापारावर परिणाम होत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ऐन दिवाळीत होणाऱ्या नुकसानीचा निषेध करण्यासाठी आपले सर्व व्यापार बंद ठेवणार आहेत. आज दुपारी तीन ते पाच दरम्यान हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!