Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आता अशोकस्तंभसाठी दीड महिना रस्ता बंद; स्मार्ट रोडसाठी मनपाची स्मार्ट कसरत

Share

नाशिक : त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा स्मार्ट रोड झाला असताना आता शेवटचा टप्पा असणाऱ्या अशोक स्तंभ भागाचे काम कार्नाय्त येणार आहे. यासाठी तब्बल दीड महिना हा मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे येथे कनेक्ट होणाऱ्या पाच रस्त्यांना वाहतूक नियोजन कोलमडणार आहे.

दरम्यान गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरु असलेला स्मार्ट रोड वाहतुकीसाठी नुकताच खुला करण्यात आला होता. सीबीएस आणि मेहेर सिग्नल या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात येऊन वाहनधारकांना वर्षानंतर या मार्गावरून जाण्यासाठी परवानगी मिळाली होती. परंतु आता शेवटचा टप्पा असलेल्या अशोक स्तंभ भागात स्मार्टरोडचे काम हाती घेण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. यासाठी हा रस्ता किमान ४५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नल हा रस्ता दुहेरी करण्यात येणार असून, येथून जाणाऱ्या सिटी बसेसचा मार्गही बदलण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा एक किमीचा स्मार्ट रोड नागरिकांना लवकरच खुला होणार होता. मधल्या काळात या कामाला गती मिळाल्याने काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. मेहेर सिग्नल नंतर अशोकस्तंभ हा महत्वाचा सिग्नल असल्याने या ठिकाणी पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथील चौकाचे नूतनीकरण हे महत्वाचे आहे.

त्यासाठी आता काम हाती घेतले असून पुढील ४५ दिवस हा रस्ता बंद ठेवावा लागणार असून यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिका त्यादृष्टीने नियोजन करीत आहे. त्यामुळे खरोखरच महापालिकेने घेतलेला ४५ दिवसांचा अवधी या कामासाठी पुरणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!