Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Viral Video : नाशकात असे असणार मेट्रोचे जाळे?

Share

नाशिक : सध्या नाशकात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे जोरदार काम चालू असून नुकतंच नाशिक महामेट्रोच मेट्रो निओ असे नामकरण करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी कि,वाहतुकीला चालना मिळावी यासाठी नाशिक शहरात नियोजित असलेल्या नाशिक महा मेट्रोचे मेट्रो निओ असे नाव ठेवण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अद्याप प्रशासनाकडून काही सांगण्यात आले नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात बॅटरी किन्वा इलेक्ट्रिक बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर सर्वेक्षण सुरु आहे.

दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वीस हजार प्रवाशी क्षमता असणाऱ्या बसची लांबी २५ मीटर असून वाहतुकीसाठी दोन कॉरिडॉर असतील. तसेच शहरातून प्रमुख दोन कॉरिडॉर अनुक्रमे २२ किलोमीटर तर दुसरा ९ किमीचा असेल. यात २२ किमीचा गंगापूर येथून सुरु होत असून पुढे शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर आणि शेवटच स्थानक नाशिकरोड असणार आहे. तर दुसरा कॉरिडॉर नऊ किमीचा असून यात गंगापूरला सुरु होऊन जलालपूर मार्गे नवश्या गणपती, थत्ते नगर, मुंबई नाका असा असेल.

दरम्यान या कॉरिडॉर मध्ये सीबीएस हे मुख्य स्थानक राहील. दोन ठिकाणी बस डेपोट असून २९ स्थानक असतील. २०२३ पर्यंत हा नाशिक मेट्रो निओ प्रकल्प होण्याची शक्यता आहे, असे या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. परंतु प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!