Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार नाशिक मेट्रोचे उदघाटन

Share

नाशिक : शहरातील वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असलेला १८०० कोटींचा नाशिक मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात येत असून पुणे आणि नागपूर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यानंतर आता नाशिकमध्येदेखील हे काम सुरू होत आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो हा एक प्रभावी उपाय असून ८० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. त्यासाठी दोन ट्रॅकचा २८ किलोमीटर एलीव्हेटेड कोरीडोर असेल. रुळ ऐवजी रबर टायरचा वापर असलेली ही मेट्रो विजेवर चालेल.

मेट्रो हा सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रभावी माध्यम ठरणार असून याद्वारे वाहतुकीला चालना मिळणार आहे. पारंपरिक वाहतूक साधनाच्या तुलनेत हे वेगळे साधन नाशिककरांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

नाशिकला महामेट्रो च्या नियोजनाला प्रारंभ; २०२३ मध्ये दोन मार्गांवर धावणार मेट्रो

सूत्रांच्या अनुसार नाशिक महानगरपालिकाच्या अंतर्गत नाशिक मेट्रो आणि नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्प या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन एकाच दिवशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हे उद्घाटन होणार असून अदयाप तारीख ठरवण्यात आलेली नाही.

सदर प्रकल्प ३ हजार कोटींचा असून १८०० कोटी नाशिक मेट्रो साठी तर उर्वरित १२०० कोटी नाशिक स्मार्ट सिटी साठी वापरण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!