Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लघु उद्योगातून फुलतोय महिलांचा संसार

Share

नाशिक । श्वेता खोडे 
सध्या शिक्षित झालेल्या अनेक युवक युवतींना रोजगार मिळणे हे खडतर झालेले आहे. शिक्षणाबरोबरच रोजगारही उपलब्ध व्हावा यासाठी तरूणाईची धडपड असून यातीलच एकमार्ग म्हणजे लघु उद्योग होय. या छोट्या छोट्या उद्योगांकडे सध्या तरुणी आकर्षित होत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवती व्यवसायपुरक प्रशिक्षण घेतांना दिसत आहेत.

या प्रशिक्षणानंतर स्वावलंबी जीवन जगण्याकडे वाटचाल करतांनाचे दृश्य शहराबरोबरच ग्रामीण भागातही दिसून येत आहे. तसेच सध्या महिला व मुलींना शिवणकाम, पार्लर यासारख्या क्लासेसचे वेध लागलेले दिसतात. आपल्या घरगुती कामातून वेळ काढून एक व्यवसाय व आवड म्हणून या क्षेत्राकडे विविध महिला या वळतांना दिसतात तर काही महिला या चांगले शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्याने या क्लासेसची निवड करतात. स्वतःचा असा व्यवसाय उभा करतात.

तसेच मेहंदी, रांगोळी, शिवणकाम , पार्लर, मोत्याच्या वस्तू तयार करणे, ज्वेलरी बनवणे यासारख्या किरकोळ कामालाही मोठया प्रमाणात वेळ खर्च करून महिला हा व्यवसाय करण्यासाठी विविध क्लासेस लावतात व प्रशिक्षण घेतांना दिसतात. विविध सण उत्सवात व लग्नसमारंभाच्या काळात हे व्यवसाय मोठया प्रमाणात चालतात. आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन घरातच व्यवसाय सुरू केला जातो. त्याला जोड म्हणून प्रशिक्षणही केले जाते. परिणामी नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय थाटण्याचे स्वातंत्र्य मिळते. महिलांप्रमाणे तरुण मुलींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे अशा क्लासेसचे प्रमाण वाढल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून रांगोळी, पार्लर, शिवणकाम, ज्वेलरी बनवणे हे क्लासेस घेत आहे. यातील अनेक महिला घरकाम करून या प्रशिक्षणासाठी येत असतात. तसेच अशिक्षित महिलाच नाही तर नोकरी सांभाळून काही महिला प्रशिक्षण घेत आहेत.
– रेवती पंडित

बी.एड करून जॉब नसल्याने शिवणकाम व पार्लर प्रशिक्षण पूर्ण केलं. आता स्वतःहा व्यवसाय सुरू केला असून दिवसभरातून खूप ऑर्डर येतात. यातून आर्थिक क्षमताही वाढत आहे.
-युगश्री राजवाडकर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!