Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये पुढील काही दिवस कोरडे हवामान राहणार…

Share

नाशिक : पुढील तीन आठवडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ांचे अस्तित्व आता अल्पकाळ राहणार असल्याने परिणामी पावसाचा जोर कमी होत जाणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान राज्यामध्ये पाऊस पडण्यास आवश्यक असलेली स्थिती सध्या कमकुवत असल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असून हा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने ओडिसा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे.

तसेच मागील १० ते १२ दिवस दक्षिण-मध्य महाराष्ट्र, उत्तर-मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या पूर्व भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे राज्यात भीषण महापूर आला होता. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!