Type to search

Breaking News क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

96 तास सलग स्केटिंग करत आठ उंचाकांची नोंद

Share

नाशिक । प्रतिनिधी
कर्नाटक येथे महाराष्ट्राच्या स्केटींग संघाने सलग 96 तास रोल स्केटिंग करत आठ उच्चांक आपल्या नावे केले आहेत.
कर्नाटकच्या बेलगाव येथे शिवगंगा रोलर स्केटिंग अ‍ॅकडमीच्या मैदानावर हे उच्चांक नोंदवण्यात आले.

यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशयाई बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन यंग अचिवर बुक ऑफ रेकॉर्ड, बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड, ग्लोबल रेकॉर्ड, एशयाई पेसिफिक रेकॉर्ड, नॅशनल रेकार्ड व चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड अशा आठ पुस्तकांमध्ये या उचांकाची नोंद करण्यात आली आहे.

या सघात सिमॉन डिसुजा, हर्शिद चोपडा, अर्णव गाडे, मुद्रा घोरपडे, ऋद्र घोरपडे, अंश तांबोळी, आदित्य भोसले, इप्सा माशालकर, जेनिशा कर्ले, आदिती गाडे, स्वरनिम गुरव, विराज चिविलकर, स्पर्श बने, अलोक राऊत, पलाश पवार, भुषण बिहिराम, वेद नाईक, विघ्नेश पवार, पुष्कर बागुल, गितेश खाडे, हर्ष ओक, ऋषभ सिंग, अनन्या सिंग, शौर्य सिंग, धृ्रव तावडे, देवेंद्र घोरपडे, शमिका ओक, सुरज गरवालिया यांचा सामावेश होता.

बदलापूर येथील सुरज स्केटिंग अ‍ॅकेडमीचे प्रशिक्षक कौशिक गरवालिया, मनिषा गरवालिया यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!