नाशिककर भगिनींनी बांधली पोलिस बंधूंना राखी

0

नाशिक, ता. ७ :  नाशिक सायकलिस्ट असोसिएशन व मानवता हेल्थ फाउंडेशनच्या वतीने नाशिककर भगिनींनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या पोलिस विभागातील बंधूंना राखी बांधून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला.

आपल्या परिवारापासून  दूर राहत कर्तव्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोलिसांना राखी बांधून आज रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

यावेळी साधना दुसाने, शिल्पा पारनेरकर, मोना बोरसे, ममता कुलकर्णी, लता पाटील, सुनीता भुसारे, स्नेहा मोडक, संगीता केडिया,  सुगंधा व्यवहारे आदींसह महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*