वावी पोलीस ठाण्यातील हवालदार लाचलुचपतच्या ताब्यात

0

सिन्नर । वार्ताहर : गेल्या महिन्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची मांडवली करून २० हजार यापूर्वीच घेतलेल्या व उर्वरित ३० हजार रुपयांसाठी संबंधीताकडे सतत मागणी करणाऱ्या वावी पोलीस ठाण्यातील हवालदारास आज दि.२२ रात्री ८ वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने ताब्यात घेतले.

तक्रार दाराने सादर केलेल्या पुराव्याची खात्री झाल्यावर २० हजार रुपयांची रक्कम यापूर्वीच घेतली असल्याचे उघड झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. हवालदार अजित जगधने असे ताब्यात घेतलेल्या हवालदाराचे नाव असून या गुन्हयात आणखी दोघांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*