Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery: सिन्नरला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Share

सिन्नर । वार्ताहर : गेल्या दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्यात सुरु असलेल्या अवकाळी व पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.

जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्यासह काही भागात गहू व कांदा पिकांचे या अवकाळी पावसाने नुकसान केले असून आज दि. १६ दातली, मुसळगाव परिसराला गारांनी झोडपले तर सिन्नर शहरासह पांगरी, देवपूर, पंचाळे, भोकणी, खंबाळे, गुळवंच, डुबेरे, सोनारी परिसरात जोरदार पाऊस पडला. दुपारी १२ वाजेपासून मुसळगाव ते दातली दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली.

तर वावी परिसरात सायंकाळी पाऊस सुरु होता. गारांच्या माऱ्यामुळे या परिसरातील शेतकरी, व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शुक्रवार पासून तालुक्यात वादळी वारे, गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी वित्त हानी झाली आहे. सिन्नर शहर व परिसरात आज दुपारी सुमारे एक तास जोरदार पाऊस पडला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!