ऐन लग्नात ‘शुभमंगल सावधान’ ऐवजी ‘संविधान’ प्रतीचे वाटप

0

सिन्नर । वार्ताहर
लग्न म्हटलं की, वरात, मानपान, फटाके, बँजो-डिजे असा वरेमाप खर्च अन् शेवटी शुभमंगल सावधान म्हणत नवदाम्पत्य विवाह वेदीवर एकरुप होते. मात्र ‘सावधान’ ऐवजी ‘संविधान’च्या प्रतींचे वाटप करुन नवदाम्पत्याने नवा आदर्श निर्माण केला आहे.

तालुक्यातील पाटपिंप्री येथील परशराम बाबुराव ढेंगळे यांची कन्या माधुरी व जिल्हा परिषदेचे नाशिकचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र वामन शिरसाठ यांचे चिरंजीव विशाल यांचा मंगल परिणय नुकताच झाला. परंतु लग्नात मानपान, वरात, फटाके यावर होणारा अनाठायी खर्च टाळून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी संविधानाच्या प्रतींचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, मोहन आढांगळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष मंगेश जाधव, कृषि अधिकारी रविकांत पवार, नितीन वाघमारे, राजेंद्र शिरसाठ, के. के. बच्छाव , मंगेश बोरसे, महाराष्ट्र बँकेच्या नाशिक शाखेचे मुख्य प्रबंधक शशिकांत ढेंगळे, आर. बी. ढेंगळे, मुख्याध्यापक सचिन ढेंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या आदर्श उपक्रमाबद्दल मान्यवरांनी नवदाम्पत्यांचे आणि ढेंगळे व शिरसाठ परिवाराचे कौतुक केले तसेच या कुटूंबांचा आदर्श घेऊन लग्नात होणार्‍या अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजु विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत करावी जेणेकरुन त्यांना ध्येयप्राप्तीस मदत होईल असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

LEAVE A REPLY

*