Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | सिन्नर : जोगलटेंभी येथे पुजाऱ्याला वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Share

सिन्नर : अजित देसाई
गेल्या दोन दिवसांपासून दारणा व गोदावरी नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली असून सिन्नर तालुक्यातील जोगलटेम्भी येथे दारणा गोदा संगमावर असणाऱ्या महादेव मंदिराला आला पाण्याचा वेढा पडला आहे.

या मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याची सुटका करण्यासाठी आज दि.5 सकाळी दहा वाजेपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. बोटीच्या माध्यमातून एनडीआरएफचे पथक बचावासाठी निघाले असून पाण्याचा विसर्ग मोठा असल्याने व पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत.

जोगलटेंभी येथे नदीपात्रालगत पुरातन महादेव मंदिर आहे. मोहन दास बाबा (वय ५०) हे या मंदिराचे पुजारी असून सभामंडपाच्या वरच्या भागात ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी खोली बांधून निवासाची व्यवस्था केली आहे. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नदीपात्रात पाणी वाढायला सुरुवात झाल्यावर ग्रामस्थांनी मोहनदास बाबांना मंदिरातून बाहेर पडून गावात येण्याचा आग्रह धरला.

मात्र त्याला नकार देत बाबा मंदिरातच वास्तव्याला थांबले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने सभामंडपात दहा फूट पाणी होते. यामुळे ग्रामस्थांकडून मोहनदास बाबा यांची सुटका करण्यात अडचणी येत होत्या.

पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने रात्रभर कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली नाही. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तहसीलदार राहुल कोताडे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे यांच्यासह आपत्तीत आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक जोगलटेंभी गावात पोहचले. तत्पूर्वी मंडळ अधिकारी गाडे व तलाठी स्वरूप बोराडे यांनी स्थानिक जीव रक्षकाच्या मदतीने मोहनदास बाबांना पिण्याचे पाणी व खाद्यपदार्थ पोहोचण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे सदर जीव रक्षकाला पुढे जाणे अशक्य बनले होते. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव पथकाने होडीच्या साहाय्याने नदीच्या प्रवाहात बचावकार्य सुरू केले आहे. तथापी पाण्याचा वेग अधिक असल्याने व पाऊस देखील सुरू असल्याने या अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!