Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : निळवंडेच्या उपवितरीकांचे काम समृद्धीच्या आधीच होणार पूर्ण

Share

सिन्नर । वार्ताहर : नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील सहा गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या सिन्नरमधील उपवितरीका समृद्धी महामार्गाचे काम होण्याच्या आधीच पूर्ण करण्याची कालवा कृती समितीची मागणी जलसंपदा विभागाने मान्य केली असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाला पत्र दिले आहे.

अकोले तालुक्यात बांधण्यात आलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम गेली ४८ वर्ष रखडली होते. सदरचा प्रकल्प कालव्यांसह पुर्ण करण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने पाठपुरावा केला असून उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने या कामाला गती मिळाली आहे. मात्र दरम्यानच्या काळात कालव्याच्या कामासाठी उपलब्ध निधी अन्यत्र वळवण्याचा घाट घालण्यात आला.

हा निधी पुन्हा वर्ग होण्याचे, काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे व लाभक्षेत्रातील १८२ अवर्षणग्रस्त गावांच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण टाकण्याचे काम बाकी असताना राज्य सरकारने सुमारे ५६ हजार कोटींचा मुंबई-नागपूर हा महत्वांकाक्षी प्रकल्प मंजूर केला आहे.

हा महामार्ग निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातून सिन्नर तालुक्यातील सायाळे, मलढोण, पाथरे, दुशिंगपूर आदी गावांतून जात आहे. मात्र या निळवंडेच्या शेवटाकडील प्रस्तावित वितरिका व उपवितरीका अद्याप पूर्ण झालेल्या नाही. समृद्धी महामार्गाच्या कामाच्या आधी या वितरिका पूर्ण होणे गरजेचे आहे या कडे निळवंडे कालवा कृती समितीने संगमनेर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे लक्ष वेधले होते.

सदरच्या वितरिका, उपवितारीका महामार्गाच्या कामाआधी पूर्ण करण्याची मागणी समितीने केली होती. ही मागणी अप्पर प्रवरा -२ विभागाने मान्य केली असून या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक येथील शिबिर कार्यालयाकडे पत्रव्यवहार  केला आहे.

सिन्नरमधील समृद्धी बाधित गावांमध्ये निळवंडे डाव्या कालव्याच्या तळेगाव शाखेच्या वितरिका महामार्गाला छेदून जात असून या वितरिका ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गास छेदतात त्या ठिकाणी योग्य त्या आकाराचे क्रॉसिंग करणे आवश्यक आहे.

सदर कालव्यांची कामे सी.बी.एल.प्रमाणे होणार असून कालवा तळ पातळी राखण्यात यावी व बांधकामास अर्धा मीटरची सिल्ट पॉकेट ठेवण्यात यावे असे जल संपदा विभागाने म्हटले याआहे.

कालवा विभागाने सिन्नर तालुक्यातील वितरिकांच्या कामाची दखल घेतल्याने निळवंडे कालवा कृती समितीचे  नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, गंगाधर रहाणे, तानाजी शिंदे, ज्ञानदेव शिंदे, बाजार समिती संचालक सुधाकर शिंदे, भास्कर शिंदे, विजय शिंदे, रामनाथ ढमाले आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!