Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

युवकाच्या डोक्यात पोलिसाने घातला दंडुका; युवक आयसीयूत

Share

नाशिक रोड प्रतिनिधी : पोलिसांनी दुचाकी चालकाच्या डोक्यात दंडुका मारल्याने युवक गंभीर झाल्याची घटना सिन्नर फाटा येथे घडली आहे. शुभम ज्ञानेश्वर महाले असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याला आडगाव येथील मराठा विद्या प्रसारकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तो अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

संबंधित पोलिसाने डोक्यात काठी मारल्याने रक्तस्राव होऊन त्याची शुद्ध हरपली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. सदरचा प्रकार सिन्नर फाटा पोलीस चौकी समोर घडला.

शुभम व त्याचा भाऊ सिन्नरकडून नाशिकरोड कडे येत असतांना दुचाकी थांबवली नाही. म्हणून पोलिसाने पाठीमागून येऊन डोक्यात काठी मारली. त्यामुळे रक्तस्राव झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags:

You Might also Like

2 Comments

  1. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत, लोकांच्या डोक्यावर काठी मारून सुव्यवस्था टिकत नाही उलट तर पोलिस या नावाची दुषित प्रतिमा लोकांच्या डोक्यात घर करते.

    Reply
  2. शुभम जाधव May 23, 2019 12:22 am

    जनतेचा राक्षकच भक्षक झाला..का तर 100 rs साठी त्या बिचाऱ्याच्या जीवाशी खेळ केला…निषेध ह्या पोलिसांचा✖️✖️❌❌❌❌

    Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!