Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | सिन्नर : चासमध्ये आढळला जखमी बिबट्या; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Share

सिन्नर : भोजापूर खोऱ्यातील चासमध्ये बिबट्या जखमी अवस्थेत आढळला आहे. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मोकळ्या जागेत बिबट्या जेरबंद करणे अवघड असल्याने नाशिक येथून वनविभागाची विशेष टीम चासमध्ये दाखल होत आहे.

 

सिन्नरजवळील नांदूर- चास रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्या आढळला. या घटनास्थळापासून जवळच आदिवासी कुटुंबांची वस्ती असल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. तसेच बिबट्यास चालता येत नसून आजारी असावा असा वन अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!