Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर पोलीसांनी पकडले 2 लाखांचे गोमांस; दोघे अटकेत

Share

सिन्नर । वार्ताहर : आज (दि. ३०) मध्यरात्री १२. ३० वाजेच्या सुमारास सिन्नर – घोटी महामार्गावर भाटवाडी शिवारात गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो सिन्नर पोलिसांनी पकडला. या टेम्पोतून वाहून नेले जाणारे ०२ लाखांचे गोमांस पोलिसांनी हस्तगत केले असून दोघांना अटक केली आहे.

मुंबईकडे चोरट्या मार्गाने गोमांसाची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक अशोक राहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून वाहन तपासणी करण्यात येत होती. भाटवाडी शिवारात रात्री १२. ३० वाजेच्या सुमारास गुरेवाडी बायपासने येऊन घोटीकडे जाणाऱ्या एमएच ०३ सिपी ७२९२ या टेम्पोत बर्फाच्या लाद्यांखाली मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले.

सुमारे २ लाख रुपये किमतीचे हे मांस मुंबईकडे वाहून नेले जात होते. पोलिसांनी सदर टेम्पो ताब्यात घेत सलाउद्दीन शहाउद्दीन सैय्यद (२६) व सलमान सलीम शेख (२५) दोघे रा. कुर्ला यांना अटक केली आहे. कारवाईत जप्त केलेल्या गोमांसाची जमिनीत गाडून विल्हेवाट लावण्यात आली.

दरम्यान याच कारवाई दरम्यान घोरवड घाट परिसरातून देखील गोमांसाची दोन वाहने पोलिसानी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. मात्र त्या वाहनाबाबत पोलिसांकडून माहिती सांगण्यास नकार देण्यात आला.

स्कोडा कारचे गूढ
सिन्नर पोलिसांकडून मध्यरात्री गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली गेली असली तरी भाटवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला टायर फुटलेल्या अवस्थेत पहाटेपर्यंत उभ्या असणाऱ्या लाल रंगाच्या स्कोडा कार बाबत गूढ कायम राहिले. या कार मध्ये देखील गोमांस असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनाफोनी झाल्यावर सिन्नर पोलिसांनी बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या या कारचा ताबा घेतला. मात्र या कार बद्दल देखील पुरेशी माहिती नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!