Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : सिन्नरला पावसाचे जोरदार ‘कमबॅक’

Share

सिन्नर : सिन्नरसह तालुक्यातील ठाणगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सिन्नर शहरासह परिसरात दुपारी एक वाजेपासून पावसाने आगमन केल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यामुळे काही ठिकाणी शेतात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.

दरम्यान परतीच्या पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली असून तीन दिवसांपूर्वी वणी येथे मुसळधार पाऊस झाला. तसेच नाशिकमध्ये ही गेल्या व तीन दिवसांपासून पाऊसाचे कमबॅक झाले आहे.

सिन्नर परिसर, ठाणगाव, एसएमबीटी धामणगाव परिसरातही दोन ते तीन तास संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी या पावसाचा परिणाम शेतीवर दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!