Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-सिन्नर खड्ड्यांचा मार्ग

नाशिक-सिन्नर खड्ड्यांचा मार्ग

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) सिन्नरदरम्यान (sinnar) मार्गक्रमण करताना दर 50 ते 100 मीटरदरम्यान असंख्य खड्डे (potholes) असल्याने हा मार्ग खड्ड्यांचा महामार्ग म्हणून प्रवासी, वाहनचालकांकडून चर्चेत

- Advertisement -

नाशिक-पुणे महामार्गाचे दोन-तीन वर्षांपूर्वीच नूतनीकरण (Renewal) करून त्याचे चौपदरीकरण झाले आहे. नाशिक ते सिन्नर हा मार्ग या महामार्गाच्या कामात शेवटच्या टप्प्यात काम पूर्ण झालेला आहे. तरी पावसाळ्यात (monsoon) रस्ता कामाचा (road work) दर्जा अल्पावधीत उघड झालेला आहे. जागोजागी खड्डे, रस्त्याचे डांबरी अस्तर उखडणे, भराव खचलेला आणि साईडपट्ट्यांवर चिखलाचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना मार्गक्रमण करताना चालण्यासारखी कसरत करावी लागत आहे.

सिन्नर फाटा ते पळसे मार्गावर जागोजागी खोल खड्डे (potholes) पडलेले आहेत. त्यामुळे गाड्यांना अपसूकच बे्रक लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने महामार्गावर अपघातांचे (accidents) प्रमाणही वाढले आहे. पळसे ते शिंदे टोलनाकादरम्यान (toll naka) पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी पसरल्याने वाहने पंक्चर (puncture) होण्याच्या घटना वाढल्या आहेत. टोलनाक्यावर काँक्रिटीकरण (concretization) केलेला रस्ता असूनही सर्व लेनमध्ये खड्डेच-खड्डे पडलेले आहेत. पावसाने हे खड्डे पडल्याचे सांगण्यात येत असले तरी नवीन मार्गाची एवढ्या लवकर दुरवस्था कशी, याचे आश्चर्य वाहनचालकांना वाटत आहे.

सिन्नर घाटात रस्त्याच्या दुतर्फा केबल टाकण्याचे काम करण्यात येत असल्याने या कामाच्या मशिनरींमुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर या घाटात लेनही संकुचित आहेत. सिन्नर (sinnar) वळण मार्गावर टी पॉईंटवर रस्ता जेसीबीने उकरून ठेवण्यात आलेला आहे. त्याची सूचना देणारे फलक लावलेले नाही. त्यामुळे बायपासकडे जाण्यासाठी वळण घेणारी चारचाकी वाहने खड्ड्यांत आदळून क्षतीग्रस्त होत असल्याची वाहनचालकांची ओरड आहे.

महामार्गावर जागोजागी दुभाजक पंक्चर करून मधून वाट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या रोपांमध्ये पावसाने वाढून बकला स्वरूप आले आहे. रोपे अस्तावस्त वाढल्याने त्यांची छाटणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या