Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : शपथविधीला उपस्थित असणारे आमदार कोकाटे ‘नॉट रिचेबल’

Share

 नाशिक :  राज्यातील रंगलेल्या सत्तानाट्यात मुख्यमंत्र्यांच्या शपथवेळी अजितदादांसोबत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित होते.

राजभवनावर झालेल्या या प्रसंगी राष्ट्रवादीच्या 15 आमदारांची उपस्थिती होती. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह नाशिकमधून दिलीप बनकर आणि नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती देखील महत्वाची मानली गेली. बनकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे अजितदादांसोबतची त्यांची उपस्थिती राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

कोकाटे यांची भूमिका नेहमीप्रमाणेच बंडखोरीची राहिली असून शपथविधी आटोपल्यावर ते अखेरपर्यंत अजितदादांसोबत होते. या घडामोडीत त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचा भ्रमणध्वनी व्यस्त असल्याचे दाखवत होता. त्यानंतर मात्र कोकाटे नॉट रिचेबल झाले. शपथविधी आटोपल्यावर राजभवनावर राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार पवार यांना येऊन भेटले.

दरम्यान यासंदर्भात आमदार कोकाटे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही.अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला.तिथे क़ाय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते.पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापीही बदलनार नाही.!’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!