Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : विंचुर दळवीत पुन्हा बिबट्याचा हल्ला

Share

विंचुर दळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथील भगूर पांढुर्ली रस्त्यालगत असलेल्या शेळके वस्तीमध्ये असलेल्या गोठ्यात प्रवेश करून आज बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

किसन बगाराम शेळके यांचा शेळके वस्तीवर घराजवळ गोठा आहे आज रात्रीच्या अंदाजे एक दोनच्या सुमारास बिबट्याने गोठ्यामध्ये प्रवेश करून समोर असलेल्या दोन्ही शेळ्यांवर हल्ला चढवत त्याना ठार केले. मृत शेळ्यांचा मृतदेह तिथेच सोडून बिबट्याने धूम ठोकली . सकाळी उठल्यावर शेळके हे गोठयामध्ये गेल्यावर त्याना संपूर्ण प्रकार लक्षात आला.

हल्ल्याची माहिती मिळताच वनविभाग अधिकारी व वैद्यकीय डॉक्टर यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. परिसरामध्ये वारंवार बिबटयाचे हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी शाम दळवी, प्रसाद शेळके , सुरेश शेळके, बाळू शेळके, नितीन शेळके, अनिल शेळके , समाधान शेळके, संग्राम जाधव आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!