Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : घराची भिंत पडल्याने सोमठाणेत चार जखमी

Share

सिन्नर | वार्ताहर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या असलेल्या संततधारेने संपूर्ण तालुका जलमय झाला असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांना तडे गेले असून काही ठिकाणी भिंती पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

तालुक्यातील सोमठाणे येथे वज्रेश्वरी मंदिरालगत असलेल्या अचानक नगर या आदिवासी वस्तीतील निवृत्ती काशिनाथ पवार यांच्या कच्चे बांधकाम असलेल्या घराची भिंत भीज पावसाने ढासळण्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत निवृत्ती पवार यांच्यासह त्यांची आई मुक्ताबाई पवार, भाची साक्षी वाघ (वय ६) व मावशी रत्‍नाबाई ज्ञानदेव बर्डे या जखमी झाल्या.

नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी वडांगळी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. मुक्ताबाई पवार यांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना सिन्नर येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!