Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शिर्डी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

Share

सिन्नर : शिर्डी महामार्गावर वावीजवळ वाहनाच्या धडकेत हरीण ठार झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली.

दरम्यान आज सकाळी शिर्डी महामार्गावर वावी नजीक रस्त्यावर पाण्याच्या शोधार्थ निघालेले हरीण रस्ता ओलांडत होते. याचवेळी अज्ञात वाहन चालकाने या हरणाला जोराची धडक दिली. यात हरणाचा मृत्यू झाला.

उन्हाळा सुरु झाल्याने परिसरातील वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. या परिसरात मोर व हरिणांची संख्या अधिक असून यादीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तसेच जवळच सिन्नर शिर्डी महामार्ग असल्याने वाहनांची ये जा चालू असते.

त्यामुळे वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यासाठी वेळीच प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!