Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : कंटेंनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार

Share

पाथरे : सिन्नर -शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर देर्डे (कोपरगाव) येथे भरधाव कंटेनरने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक देऊन केलेल्या अपघातात देवपूर ता. सिन्नर येथील किरण संतोष गडाख ही महाविद्यालयीन तरुणी ठार झाल्याची घटना आज (दि.१४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान किरण मामा विकास नवनाथ निरगुडे रा. पाथरे यांचे सोबत दुचाकीवरून कोपरगाव येथील संजीवनी पॉलिटेक्निक येथे जात होती. निरगुडे हे याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला असून किरण अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिचे मूळ गाव देवपूर असून वडिलांच्या निधनानंतर दहावीपासून ती मामांकडे शिक्षणासाठी होती. या अपघातात निरगुडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून कोपरगाव येथे त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले.

मयत किरणच्या पाठीमागे आई, दोन लहान बहिणी असा परिवार आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या व वडिलांचे छत्र हरपलेल्या किरणच्या अपघाती मृत्यूमुळे पाथरे व देवपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!