Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : डुबेरे येथे दहा वर्षीय मुलाचा विहरीत पडुन मृत्यू

Share

सिन्नर | वार्ताहर

मामाच्या गावी आलेल्या दहा वर्षीय भाच्याचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याने ऐन दिवाळीत सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तब्बल १५ तासांच्या अथक प्रयत्नाअंती मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

अधिक माहिती अशी की, काल (दि. २८) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास तालुक्यातील डुबेरे येथेईल माळी मळ्यात साई धनंजय खेडकर (वय १०) हा मुलगा खेळत होता. याच वेळी शेजारी असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत पडला. ८० फुटांच्या विहिरीत पडल्याने मुलाचा शोध घेणे अवघड झाले होते. पट्टीच्या पोहोनार्यांचे प्रयत्न फोल ठरले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानासह जीवरक्षक गोविंद तुपे यांच्या पुढाकाराने मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले. पंधरा तासांच्या अथक प्रयत्नाअंती मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

ऐन दिवाळीत दहा वर्षांचा मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने दोन्हीही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्दैवी घटनेने सिन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!