Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकनगरीवर दाटले रेशमी धुके…; आर्द्रता गेली 95 टक्क्यांवर

Share

नाशिक । यंदाच्या पावसाळ्याने शेतकर्‍यांना भरभरुन पाणी दिल्यानंतर नकोश्या झालेल्या पावसानंतर परतीच्या पावसाने हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरविले आहे. परतीच्या पाऊसाने आणि चक्रीवादळाने सर्वत्र शेतीपीके नष्ट करीत शेतकर्‍यांवर महासंकट आणले आहे. अजुनही पाऊसाचे संकट डोक्यावर असतांना आज हंगामातील सर्वात दाट अशा 95 टक्के आद्रता असलेल्या धुक्याचा अनुभव जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला. यामुळे वातावरणात बदल होऊन थंडीची चाहुल लागली आहे.

राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडविला असुन वीजेच्या कडकडाट, वादळी वार्‍यासह आणि गारांसह पडणार्‍या पावसाने अनेकांचे प्राण घेतले. यंदा हवामान खात्यांच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ज्या प्रमाणात पाऊस झाला, त्याचप्रमाणात आता थंडी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अशी शक्यता व्यक्त केली जात असतांना अरबी समुद्रावर तयार झालेल्या नव्या चक्रीवादळामुळे पुन्हा येत्या चार पाच दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पहाटेच्या धुक्याने पावसाची जागा घेतल्याचे दिसुन येत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धुके आज पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत पडले होते. यावेळी हवेतील आद्रता 95 टक्के इतकी नोंदविली गेली आहे. या धुक्यामुळे आता थंडीची चाहुल लागली आहे.

दिवसात 194 मि. पाऊस
1 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात अनेक भागात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला. अवघ्या काही तासात पडलेल्या मुसळधार पाऊसाने शेती पिके उद्ध्वस्त केली. यात केवळ नाशिक शहर परिसरात 1 ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री टप्प्या टप्प्याने 194 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद नाशिक हवामान कार्यालयाने केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!