Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उद्यापासून आशा सेविकांचे मूक आंदोलन

Share

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात (दि. ०४) तारखेपासून आरोग्य विभागातील आशा व गटप्रवर्तक यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून उद्यापासून (दि. १४) मुक आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान शासनाने दिलेले आश्वासन तिप्पट मानधन करण्यासाठीचा शासन निर्णय व्हावा यासाठी सदर आंदोलन सुरू आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून अद्यापही आंदोलन सुरु आहे. उद्या (दि. १४) व दि. १६ या दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याजवळ बसून तोंडाला काळी पट्टी लावून शासनाला विनंती करणार आहते. तसेच निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मानधन वाढविण्याचा निर्णय घ्यावा, शासन निर्णय करावा यासाठी लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र वर घेण्यात आलेला आहे.

तसेच अशा पद्धतीचा शासन निर्णय जोपर्यंत घेतला जात नाही, तोपर्यंत आशा व गटप्रवर्तक कोणत्याही प्रकारचे काम करणार नाहीत हा निर्धार कृती समितीने व्यक्त केलेला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यासमोर उद्या सकाळी १२ ते ०४ वाजेपर्यंत मुख्य धरणे आंदोलन करण्यात यावे व यात सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी सहभागी व्हावे असा आवाहन महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र च्या वतीने करण्यात येत आहे.

नाशिक येथे शहरातील आशा व तालुक्यतील आशा शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सि बी एस नाशिक येथे आंदोलन करतील. व सर्व तालुक्यात आंदोलन होईल.

-राजू देसले, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते (आयटक)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!