Type to search

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

अब कि बार महाराष्ट्र में किसकी सरकार?

Share

नाशिक : राज्यातील सत्ता स्थापनेच्या गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या प्रयत्नात शिवसेनेने दोन्ही काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा अयशस्वी दावा केला. मात्र राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने राज्यपालांसमोर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा पर्याय उरला आहे. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे राजकीय सत्तानाट्याला वेगळे वळण मिळाले आहे.

दरम्यान निकालानंतरच आज विसावा दिवस असून आद्यपही महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यात आता कोणते सरकर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काल सायंकाळपर्यंत शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा करत राज्यपालांकडे अधिक वेळ मागितला परंतु राज्यपालांनी यास साफ नकार दिल्याने परिणामी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळे आता राज्यपालांनी तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रित केले आहे.

सुरवातीला भाजपाला राज्यपालांनी निमंत्रित केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिला. यामुळे शिवसेनेला निमंत्रित करण्यात आले. तत्पूर्वी सांज्या राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तथा सोनिया गांधी यांची भेट शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार याबाबत स्पष्ट संकेत दिले.

काल सायंकाळी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आदित्य ठाकरेंसह एकनाथ शिंदे गेले असता काँग्रेसचे पत्र न मिळाल्याने म्हणजेच काँग्रेसचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना हात हलवत बाहेर यावे लागले. आज पुन्हा राष्ट्रवादी आपला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जात आहेत, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगळेपण पाहायला मिळत आहे. त्यामुळे अब कि बार महाराष्ट्र मी किसकी सरकार? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!