Type to search

नाशिक

शिवकार्यचे ९७ वे दुर्गसंवर्धन श्रमदान रामशेजवर उत्साहात

Share

नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ९७ वी दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम रविवार (दि.८) रोजी झाली. या मोहिमेत किल्ल्याच्या माथ्यावरील रोपांना पाणी टाकले. संरक्षण म्हणून त्यांना दगडी आळे तयार करण्यात आले. तसेच किल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांशी, युवकांशी, कुटुंबाशी किल्ल्यावरील आचारसंहिता, गड बघतांना घ्यावयाची काळजी, रामशेजचा इतिहास यावर दुर्गसंवाद साधण्यात आला.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या १० वर्षांपासून गड किल्ले संवर्धन करण्यासाठी सातत्याने श्रमदान करीत आहे. दरम्यान यावेळी संस्थेच्या माध्यमातून रामशेज किल्ल्यावर श्रमदान करण्यात आले. दुपारच्या सत्रात किल्ल्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या कातीव दगड गोळा करून एकत्रित रचण्यात आले. रामशेजच्या प्राचीन राम मंदिराच्या समोरील निमुळत्या मार्गात निखळलेला दगडामुळ धोकेदायक ठिकाणी लाकडी बांधीव काम करण्यात आले.

किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गात धोकेदायक मार्गात आडवे दगड रचून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी योग्य सुस्थितीत मार्गाकडे जाण्यासाठी दिशादर्शन करण्यात आले. सायंकाळी किल्ला उतरून मोहिमेचा समारोप करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!