शिव छत्रपती पुरस्कारात नाशिकचा षटकार; धावपटू मोनीका आथरेसह 6 खेळाडूंना सन्मान

0

नाशिक । प्रतिनिधी
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना दिल्या जाणार्‍या महाराष्ट्र शासनाचे शिव छत्रपती पुरस्कारांची घोषणा आज झाली असून यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, रोशनी मुर्तडक, अक्षय देशमुख, पूजा जाधव, राजेंद्र सोनार आणि संजय होळकर या सहा जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूं, मार्गदर्शक आणि संघटक याना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाते. यावेळचे सन 2017- 18 या वर्षीच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची आज महाराष्ट्र शासनाने घोषणा केली. यामध्ये नाशिकच्या सहा जणांचा समावेश आहे.

या खेळाडूंमध्ये नाशिकची आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धामध्ये पदक विजेती धावपटू मोनिका आथरे, तलवार बाजी खेळाडू रोशनी अशोक मुर्तडक आणि अक्षय मधुकर देशमुख, रोईंगचे खेळाडू पूजा जाधव आणि राजेंद्र सोनार तर क्रीडा संघटक, कार्यकर्ता म्हणून संजय होळकर याना हे पुरस्कार घोषीत झाले आहेत.

नाशिकच्या या सहा खेळाडूंनी हा मनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचा नाशिकचे जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे आणि आनंद खरे, कालिका मंदिर ट्रस्टचे संचालक दत्ता पाटील यानी सत्कार केला. यावेळी बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे आणि अंबादास तांबे आदी मान्यवर उपस्तीत होते. या पुरस्काराचे वितरण दिनांक 17 फेब्रुवारी, 2019 रोजी मुंबई येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

*