Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशकात शिवसेनेची डरकाळी घुमणार नाही

Share

नाशिक । नाशिकचे शिवतीर्थ अशी ओळख असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान व शिवसेना हे अतूट समीकरण आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असो की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तोफा या मैदानावर धडाडल्या. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला शहरात एकही जागा दिली नाही. त्यामुळे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रचारासाठी शिवसेनेची तोफ यंद धडाडणार नाही.

बाळासाहेब यांचे नाशिकवर विशेष प्रेम होते. त्याची पहिली सभा रविवार कारंजावर झाली होती. जुन्या बुधवार पेठेतील दीक्षित यांच्या पटवर्धन वाड्यात बाळासाहेब पक्षाची बैठक घ्यायचे. पुढे नाशिककरांनीही शिवसेनेला आपलेसे केले. त्यानंतर लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत शहरात शिवसेनेची डकराळी घुमली.

जवळपास 1985 पर्यंत शिवसेनेला निवडणूक चिन्ह नव्हते. त्यानंतर 1990 ला झालेल्या निवडणुकीत सेनेला धनुष्यबाण हे कायमस्वरुपी चिन्ह मिळाले. देवळालीतून बबनराव घोलप जिल्ह्यातील सेनेचे पहिले आमदार झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान हे अतूट नाते होते.

सन 1995 ला नाशकात मेळावा घेत ‘दार उघड बये, दार उघड’ अशी साद घातली आणि विधानसभेवर शिवसेनेचा झेंडा फडकला होता. सत्ता आल्यावर बाळासाहेबांच्या हस्ते गोल्फ क्लबचे नाव हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असे करण्यात आले. दर विधानसभा निवडणुकीत सभेसाठी शिवसेनेकडून या मैदानाला पसंती दिली जाते. बाळासाहेबांचे विचार ऐकणे जणू शिवसैनिकांसाठीं पर्वणी ठरायची. पुढे उद्धव ठाकरेकडे शिवसेनेची धुरा गेल्यानंतरही या मैदानालाच सभेसाठी पसंती दिली जाते.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी उद्धव ठाकरेंनी या मैदानावर सभा घेतली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची तोफ या मैदानावर धडाडणार नाही. युतीत शहरातील तिन्ही मतदारसंघ हे भाजपला सुटले आहे. त्यामुळे यंदा हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानावर शिवसेनेची तोफ धडाडणार नाही. येवला, दिंडोरी, निफाड, नांदगाव या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार असून त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!