Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ नाशिकमध्ये बॅनरबाजी

Share

नाशिक : मुख्यमंत्री पदावरुन भाजपा व शिवसेना पक्षामध्ये ‘आमचंं ठरलं’य ही भूमिका असतांना काल (दि. १५) भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होईल,असे वक्तव्य केले होते. दरम्यान शहरात आज सकाळी आठच्या सुमारास “मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ अशा आशयाचे पोस्टर लावल्याने यामुळे सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे.

परंतु अशा आशयाची पोस्टरबाजी केल्यानंतर नेत्यांनी हात झटकण्यास प्रारंभ केला आहे. महानगर प्रमुख सचिन मराठे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी या विषयावर बोलणे टाळले आहे. करंजकर यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे एवढेच सांगून आपल्या पक्षाच्या नगरसेवकाच्या कृतीवर बोलणे टाळले.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे बिगुल वाजण्याच्या तयारीत असताना शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरु झाली आहे. कालच भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे या नाशिक दौऱ्यावर असतांना आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यातच यामध्ये नाशिकच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार या आशयाचे बॅनर्स लावण्यात आली आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!