Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शिंदे येथे बापाकडून मुलांना विष पाजुन ठार मारण्याचा प्रयत्न

Share

नाशिक । प्रतिनिधी
मद्यपी पित्याने किशोरवयीन मुलगा व मुलीला बळजबरीने विषारी कीटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिंदेगावात घडली.

पंढरीनाथ बाबुराव बोराडे (48, रा. माणिक चौक, शिंदेगाव, ता. नाशिक) असे संशयित बापाचे नाव आहे. जन्मदात्रीनेच चिमुकलीला ठार मारल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसात शहरात घडलेल्या असतानाच, आता बापाने किशोरवयीन मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

ही घटना शुक्रवारी (ता.19) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. मुलीने शैक्षणिक साहित्याची मागणी केल्याने संतापलेल्या संशयित पंढरीनाथ बोराडेने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. दरम्यान नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!