शिल्पी अवस्थी यांना ‘युनिव्हर्स क्वीन’ प्रेरणादायी पुरस्कार
Share

नाशिक : नाशिकच्या सून असणाऱ्या शिल्पी अवस्थी यांना ‘युनिव्हर्स क्वीन’ प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्काराने गौरविण्यात आले. . हा पुरस्कार त्यांना फॅशन आणि सौंदर्य आणि सामाजिक कार्यात विशेष योगदान म्हणून देण्यात आला आहे.
दरम्यान शिल्पी अवस्थी यांना यापूर्वी मिस इंडिया इंटरनॅशनल, मिसेस डिवाइन दिवा, मिसेस कंजी नियलिटी, मिसेस रॅम्प वॉक आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
लखनौ येथे आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुरस्कार पटकावत शिल्पी अवस्थी यांनी सौंदर्य स्पर्धेला सुरवात झाली. शिल्पी अवस्थी या माजी खासदार सुरेंद्र पाल पाठक यांच्या कन्या असून नाशिकचे उद्योजक शैलेंद्र अवस्थी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आहेत.
आपल्या पतीबरोबर व्यवसाय हाताळण्याव्यतिरिक्त, शिल्पी अवस्थी या सामाजिक कार्यकर्ता देखील आहेत. जर देशातील युवा पिढीला चांगले मार्गदर्शन मिळले तर नक्की देशाच्या विकासाला हातभार लागेल, असं त्या म्हणतात. तसेच हा पुरस्कार माझ्यासाठी ऊर्जा देणारा असून यापुढेही मी चांगले काम करिन व समाजाच्या प्रगतीत योगदान देईल.