Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : मुक्या जीवांच्या वेदनांवर प्रेमाची फुंकर घालणारी ‘शरण’

Share

नाशिक | श्वेता खोडे

प्राणिमात्रांवर दया करा, मुक्या प्राण्यांचा जीव घेऊ नका…अशा आशयाचे फलक आपण जागोजागी पाहतो. नव्हे एखादा प्राणी वेदनेने व्हिव्हळत असेल तर आपल्या मनातही वेदना निर्माण होते. आणि आपसूकच आपल्यालाही मायेची फुंकर घालावीशी वाटते. नाशिकमधील शरण फॉर अनिमल या संस्थेने हाच विडा उचलला असून शहरातील तसेच जिल्ह्यातील मुक्या प्राण्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम हि संस्था गेल्या अकरा वर्षापासून करत आहे.

दरम्यान आग्रा हायवे एनएमसी खत प्रकल्प येथे शरण ही संस्था असून ही संस्था २००८ साली सुरू करण्यात आली. शरण्या शिट्टी यांना लहानपणापासूनच प्राण्यांविषयी आवड होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी वसंत मार्केट येथे पहिली संस्था सुरू केली. त्याच काम पाहून शासनाने त्यांना जागा दिली असून या जागेवरच गेल्या चार वर्षांपासून संस्थेचे कामकाज चालते.

कुटुंबातील सदस्य या नात्याने शरण्या यांनी या मुक्या जीवांचा सांभाळ करण्याचे व्रत जोपासले आहे. या संस्थेत जखमी कुत्रे, अपघात, स्किन इन्फेक्शन या सर्व कुत्र्यासाठी वेगळे भाग आहे. तसेच ज्यांना पाय नाही व चालता येत नाही, अशा जखमी झालेल्या शेळी, ससा, गाय, गाढव, कबुतरही यावरही या ठिकाणी उपचार चालतात. ऑपरेशन थेटर, विशेष वाहन या सुविधाही या ठिकाणी आहेत.

तसेच अपघातग्रस्त मुक्या जीवांसाठी शरणने हायड्रोथेरपी पूल विकसित केला आहे. पाळीव अथवा बेवारस मृत श्वांनाना संस्थेच्या आवारातच दफन करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नव्हे तर या जिवलगांच्या स्मृती वृक्षारोपणाच्या माध्यमातूनही जपल्या जातात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!