Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘या’ कारणामुळे शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाही

Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना ईडीकडून मेल पाठवण्यात आला असून सध्या चौकशीची गरज नसल्याचे या मेल मध्ये सांगण्यात आले आहे. परंतु शरद पवार यांनी देखील मी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे यावेळी सांगितले आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य बॅंक घोटाळा प्रकरणी शरद पवार यांची आज मुंबईत ईडी कार्यालयात चौकशी होणार होती. मात्र काही वेळापूर्वी त्यांना ईडी कार्यालयात येण्याची गरज नाही असा इमेल पाठवण्यात आला आहे. तत्पूर्वी शरद पवार हे दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात जाणार होते. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने त्यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच होती. परंतु आता शरद पवार ही ईडी कार्यालयांत जाणार नसल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह इतर ७० जणांवर महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीची चौकशी आज होणार होती.

या पार्श्वभूमीवर राज्यतील पवार समर्थकांनी रस्त्यावर उतरले होते. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत होते. परंतु शरद पवार यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केला असून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला पवार यांनी दिला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!