मारुती सुझुकीच्या व्यावसायिक वाहनश्रेणीत शान कार देशात प्रथम

0
नाशिक (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मारुती सुझुकी डिलर्सची परिषद नुकतीच अबूधाबीत पार पडली. या परिषदेत विविध श्रेणीत यश मिळविणाऱ्या डिलर्सच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील ४१५ डीलर्समधून व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ‘शान  कार’ला प्रथम क्रमांकाचा  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हा पुरस्कार शान कार्सच्या संचालिका मल्लिका सहानी व   मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल गोसावी यांनी स्वीकारला.

वाहन विक्रीच्या श्रेणीत हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शान कार्सचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल गोसावी म्हणाले की, भारतातील अनेक डिलर्सपैकी मिळालेला हा सन्मान सर्व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कामगिरीमुळे मिळाला आहे.

सर्वोत्तम मायलेज आणि दमदार मिनी ट्रक या गुणवैशिष्ठांमुळे अनेक ग्राहक समाधानी असून यामुळेच या  चालू आर्थिक वर्षात ५०० व्यावसायिक वाहनांची विक्री करणे हे लक्ष्य आहे, ते आम्ही साध्य करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

विक्रीबाबत बोलताना ते म्हणाले की, शान  कारचा  व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्रात १४% वाटा आहे. तर राष्ट्रीय पातळीवर  कंपनीच्या वाहन विक्रीत डिलरशिपचे ३% टक्के योगदान आहे. शान कमर्शियलचे हे दालन द्वारका परिसरात ट्रॅक्टरहाऊस जवळ कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

*