Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिडको : नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम अटकेत

Share

नवीन नाशिक : एका नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना सिडको परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून संशयितास ताब्यात घेतले आहे. अजय प्रधान (२१ वर्षे) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नउ वर्षाच्या मुलीच्या आईने फिर्याद दिली की, पिडीत मुलगी सिडको भागात राहत असून काल (दि. २२) सायंकाळी संशयित अजय प्रधान याने घरात खेळत असणाऱ्या मुलीस बोलावून घेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीच्या आईस हा प्रकार लक्षात आल्याने संशयित प्रधान यास जाब विचारला. प्रधान याने यावेळी ठिकाणाहून पळ काढला.

दरम्यान मुलीच्या आईने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अजय प्रधान याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास वपोनी श्रीपाद परोपकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!