वडाळानाका परिसरात ६९ हजाराचा गुटखा जप्त

0

नाशिक । प्रतिनिधी
वडाळानाका परिसरात गुटखा तसेच प्रतिबंधीत सुगंधी मसाला व तंबाखुचा बेकायदा साठा करणार्‍यावर छापा टाकून गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने 68 हजार 860 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकास अटक केली आहे.
अब्दुल मोजाहिद अहरार अहमद शेख (रा.वणी हाऊस, वडाळानाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यावसायांवर पोलीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी दिपक जठार यांना गुप्त बातमीदाराकडून अवैध गुटखा व तंबाखुच्या साठयाची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक सचीन खैरनार, महेश कुलकर्णी, पुष्पा निमसे, उपनिरिक्षक बलराम पालकर, पोपट कारवाळ, बाळू दोंदे, रविंद्र बागुल, संजय मुळक, वसंत पांडव, प्रविण कोकाटे,

येवाजी महाले, विजय गवांदे यांच्या पथकाने मुंबई – अग्रा महामार्गावरील वडाळा नाका परिसरातील केसंट चेंबर येथे छापा टाकून घरात लपवून ठेवलेला गुटखा तसेच सुगंधी पान, तंबाखू, मसाला जप्त केला. याची एकुण 797 पाकिटे जप्त करण्यात आली असून याची किमंत 68 हजार 860 रूपये इतकी आहे. हा साठा करणार्‍या शंययितास अटक करण्यात आले असून त्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

असा मुद्दे माल
* हिरा पान मसाला
* रॉयल 717 तंबाखु
* राजनिवास सुगंधी पान मसाला
* एनपी 1 जाफरारी जर्दा.
* आर.एम. डी. पान मसाला
* एम. सुगंधीत तंबाखु
* विमल पान मसाला
* व्ही 1 तंबाखु
* डब्लु चिविंग तंबाखु

LEAVE A REPLY

*