Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात पूरबळींची संख्या सातवर

Share

नाशिक । प्रतिनिधी
गोदावरी तसेच नंदिनी नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून मृत पावलेल्यांची संख्या 7 वर पोहोचली आहे. पूर आल्याच्या पहिल्याच दिवशी 4 ऑगस्टला तिघे वाहून गेल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.

6 ऑगस्टला पंचंवटीच्या हनुमानवाडी, बुरकुलेनगर येथील हेमंत देवरे (38) हाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. तो अहिल्याबाई होळकर पुलावरून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

निफाड तालुक्यातील सायखेडा येथील बचाव पथकाने वाचवलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बादल शंकर मेहतर (32 रा. सायखेडा ता. निफाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. 4) हा मद्यधुंद तरुण चांदोरी बस थांबा परिसरातील पूर पाण्याच्या फुगवट्यात अडकल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब रेस्क्यु पथकाच्या निदर्शनास आल्याने त्यास पाण्याबाहेर सुखरूप काढण्यात यश आले होते. मात्र त्याची तब्येत खराब असल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.

तर पुराच्या पाण्यात 2 मृतदेह आढळून आले असून त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. हे लोकही पुराच्या पाण्यात पडल्याने मृत झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!