Type to search

Special नाशिक हिट-चाट

video : ‘बापमाणूस’च्या टीमची देशदूत ला सदिच्छा भेट

Share

नाशिक : ‘तो तर त्या विषयातील बाप माणूस आहे’, हे वाक्य आपण कोणाच्यातरी कसल्यातरी वैशिष्ठ्यासाठी वापरतो. हे वाक्य नक्कीच एक विशेषण आहे. ज्याच्यासाठी ते वापरले जाते, त्यात नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असते. मात्र, आता ‘बापमाणूस’ नावाने मालिका झी युवा या वाहिनीवर सुरु झाली आहे. आज अखेर मालिकेचे 200 भागही पूर्ण झाले असून त्यास मराठी रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे . त्यानिमित्त बापमाणूस टीममधील सुर्याची भूमिका करणारा अभिनेता सुयश टिळक व गीताची भूमिका करणारी अभिनेत्री श्रुती अत्रे यांनी आज (दि.15) दैनिक देशदूत’च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. का रे दुरावा फेम सुयश टिळक मुख्य भूमिकेत असणाऱ्या बापमाणूस ही मालिका देखील तितकीच लोकप्रिय झालीआहे.

या दरम्यान बापमाणूसची टीम नाशिकमधील विविध गणपती पाहणार असल्याचे सांगितले. तसेच नाशिकराना त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

या मालिकेत सुयश टिळक सोबत श्रुती अत्रे, पल्लवी पाटील यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून प्रेक्षकांना या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा भावत आहेत.

झी युवा वाहिनीवरील ‘बापमाणूस’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी २०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!