Type to search

एसबीआय एटीएममधून विनाकार्ड पैसे काढा; ‘योनो कॅश’ अ‍ॅपचे नाशकात लॉचिंग

Breaking News टेक्नोदूत नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या

एसबीआय एटीएममधून विनाकार्ड पैसे काढा; ‘योनो कॅश’ अ‍ॅपचे नाशकात लॉचिंग

Share

नाशिक । प्रतिनिधी
सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बॅक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी यापुढे कार्ड जवळ बागळण्याची गरज नाही.कार्डविना एटीएममधून पैसे काढण्यासाठी एसबीआय बॅँकेने ‘योनो कॅश’ अ‍ॅप लॉँच केले आहे. नाशिक शडरात 25 एटीएमद्वारे ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती बँकेचे नाशिक उपमहाप्रबंधक सुधीर भागवत यांनी दिली.

देशभरातील 16 हजार 500 बॅक एटीएममध्ये ही सेवा देण्यात आली आहे. अशी सुविधा देणारी एसबीआय ही देशातील पहिली बँक ठरली आहे. या एटीएमला योनो कॅश पॉइंट नाव देण्यात आले आहे. याद्वारे व्यवहार करण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करावे लागले. त्यानंतर या अ‍ॅपवर सहा अंकी पासवर्ड येईल. तसेच नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे सहा आणखी एक सहा अंकी रेफरन्स नंबरही येईल.

या दोन्ही नंबरच्या आधारे योनो कॅश पॉँईटवर जाऊन रक्कम काढता येईल. हे दोन्ही पासवर्डची वेळ मर्यादा 30 मिनिटांची असेल. या अ‍ॅपमुळे एटीएम क्षेत्रात नवीन क्रांती येईल, असे भागवत यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!