Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एसबीआयच्या ग्राहकांना विनाशुल्क पैसे पाठवता येणार

Share

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकमेकांना पैसे पाठवण्याच्या कार्यप्रणातील IMPS सेवा ०१ ऑगस्टपासून पूर्णपणे मोफत करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच याचबरोबर लवकरच NEFT आणि RTGS साठी आकारण्यात येणारे शुल्क सुद्धा रद्द करण्यात येणार आहेत.

दरम्यान एसबीआयकडून यापूर्वी सदर सुविधांसाठी सूट देण्यात आली होती. परंतु आता त्यामध्ये बदल करीत एसबीआयच्या ग्राहकांना सुद्धा या सुविधा मिळणार असून आयएमपीएस सुविधा देखील मोफत करणार असल्याचा निर्णय स्टेट बँकने घेतला आहे.

या अँपद्वारे ग्राहकांना मनी ट्रान्स्फर करता येईल. तसेच काहीवेळातच हे ट्रान्सफर होणार असून यासाठी पैसे आकारणार नसल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. या सुविधेचा उपयोग करत जास्तीत जास्त दोन लाख रुपये ट्रान्सफर करु शकता येणार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!