Type to search

जागतिक पर्यावरण दिन : नाशिक येथील देवराईला सयाजी शिंदे यांची भेट

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जागतिक पर्यावरण दिन : नाशिक येथील देवराईला सयाजी शिंदे यांची भेट

Share

नाशिक : नाशिक देवराईचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर व सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध वनक्षेत्रांना अचानक भेटी दिल्या.यावेळी त्यांनी सातपूर येथील देवराई प्रकल्पाला भेट देवून तिथे सुरू असलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

सयाजी शिंदे यांनी देवराईला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणची वृक्षवल्‍ली बघून त्यांना खूपच समाधान वाटले. युवा ऊर्जा फाउंडेशनची वृक्षसंपदा बघून अमोल स्टारटेड विथ वंडरफुल मॉर्निंग अमोल आय एम रियली हॅपी. तुझ्या कामाचे कौतुक करावे तितके थोडे असून, तुझ्याकडे एखादी मोठी जबाबदारी सोपविल्यास काहीच वावगे ठरणार नाही.

याप्रसंगी सभागृहनेता दिनकर पाटील, अमोल पाटील, उद्यान अधिक्षक आमले साहेब आदी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या काही काळापासून युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून देवराई येथे वृक्ष लागवडीपासून तर त्याच्या देखभालीपर्यंतचे सर्व काम केली जात आहेत. नाशिक वनराई वन कक्ष १९५ म्हसरूळ येथे २०१६ ला पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आज त्यास तीन वर्ष पूर्ण झाले असून, येथील वृक्षसंपदा मन प्रफुल्‍लीत करणारी आहे. याचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीने याठिकाणी पाण्याचा टँकर देण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!