Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पुणे विद्यापीठात यूपीएससीसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम; ४० विद्यार्थ्यांची करणार निवड

Share

नाशिक । प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)च्या परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार असून यंदा पहिल्या वर्षासाठी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचीकुलगुरू डॉ. नितीन कळमळकर यांनी दिली.

कमी वयात स्पर्धा परीक्षांची तयारी करून यूपीएससीतील मराठी टक्का वाढण्याच्या आणि उच्चपदी विद्यार्थी पोहोचण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आली असल्याचे डॉ. कळमळकर यांनी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आणि निवृत्त आयपीएस अधिकारी जयंत उमराणीकर यांच्या उपस्थिती घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नियमित पदवी अभ्यासक्रमादरम्यानच हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम विद्यार्थी करू शकतील.

संध्याकाळी दोन तास मार्गदर्शन केले जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले उत्तरे लिहिण्याचे कौशल्य, निबंध लेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञांशी संवाद, व्यक्तिमत्त्व विकास या विषयी मार्गदर्शन केले जाणार‘ आहे. स्वतच्या अनुभवातून या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्यांवरील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाईल.

उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील उमेदवार खूप लवकर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने कमी वयातच निवडले जातात. तर महाराष्ट्रातील उमेदवार मागे पडतात. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाद्वारे केला जाईल असे उमराणीकर यांनी सांगितले. यंदा अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी ४०  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशासाठी बारावीचे गुणग्राह़्य धरले जाणार असून याअभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०७ ऑक्टोबरपर्यंतआहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून माहिती आणि प्रवेश अर्ज http://unipune.ac.in/cec/default.html  या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

कशी असेल अभ्यासक्रमाची रचना : 

  • नियमित पदवी अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतात.
  • अभ्यासक्रमांतर्गत प्रतिदिन दोन तास मार्गदर्शन
  •  स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक लिखाण कौशल्य, निबंध लेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञांशी संवाद, व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांवर मार्गदर्शन
  • पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्यांवरील मार्गदर्शन
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!