Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर रोडवरील अपघातात सातपूरचा युवक ठार

Share

नाशिक । त्र्यंबककडून येताना खंबाळे गावानजिकच्या वळणावर भरधाव वेगातील कार दुभाजकावर जाऊन धडकल्याने या अपघातामध्ये कारचालक ठार झाल्याची घटना घडली.

राहुल वसंत शिंदे (29, रा. अशोकनगर, सातपूर) असे कारचालकाचे नाव आहे. राहुल शिंदे हे आज (ता.25) पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे स्विफ्ट कारमधून येत होते.

खंबाळे गावानजिक असलेल्या वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातामध्ये कारचालक शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!