Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सातपूर : कंटेनर खाली सापडून २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

Share

सातपूर : श्रमिक नगर येथील सात माऊली चौक परिसरात एका कंटेनरच्या खाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण तौड (२७) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान सात माऊली चौक परिसरात त्रंबक रोड करून नाष्टा पाकीट घेऊन जात असताना किरण तौड जात असतांना हा अपघात घडला. यावेळी कंटेनरला ओव्हरटेक करताना समोर स्विफ्ट कारने हुलकावणी दिल्याने वाहनाचा तोल जाऊन किरण कंटेनरखाली सापडला. यांनतर २०० मीटर पर्यंत कंटेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने या दुर्घटनेत किरण तौड यांचा दुर्दैवी अंत झाला

घटनेची माहिती समजताच सातपूर पोलीस ठाण्याचे वपोनि विलास जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेननंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत कंटेनर चालकावर कारवाईची मागणी केली.

अमृत गार्डनचे बारदान फाटा दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर प्रशासनाने रिंगरोड म्हणून विकसित केले. या ठिकाणाहून अवजड वाहनांची वाहतूक केली जाते. मात्र त्यासोबतच नागरी वसाहतीची वाहतूक असल्याने अनेक वेळा अपघाताचे प्रसंग निर्माण होतात. याठिकाणी रस्त्याला प्रशस्त जागा असताना विस्तारीकरण करुन दुभाजक टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी निधी देण्याचीही आश्वासन दिले होते. मात्र ते फोल ठरले असेल आज पुन्हा एकदा युवकाला जीव गमवावा लागला ही दुर्दैवी घटना आहे.
-सिताराम ठोंबरे

सातत्याने मागणी करण्यात येत असून प्रशासन याबाबत उदासीन भूमिका घेत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन तातडीने मंजूर करावे.
-दिनकर कांडेकर

अशा घटना सातत्याने घडत असल्याने यापुढे अपघात सहन केल्या जाणार नाही. प्रशासनाने याची नोंद घ्यावी अन्यथा नागरिक आंदोलन करतील.
– अमोल पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!