Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलिसांच्या समय सूचकतेमुळे वाचले जखमी मोराचे प्राण

Share

सटाणा : सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या समयसूचकतेमुळे मोराला पोलीस स्थानकात जीवदान मिळाले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि काल रात्री साधारण साडे आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुंजवाड येथील चौंधाणे शिवारातील नाना उत्तम खैरनार यांच्या शेतात असलेल्या मोरावर कुत्र्याने जोरदार हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. नाना खैरनार यांनी जखमी मोरासह तात्काळ सटाणा पोलीस स्टेशन गाठले.

सटाणा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा यांनी लागलीच वनविभागाशी संपर्क साधत अधिकारी काकुलते हजर झाले. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पशुवैद्यकीय अधिकारी चंदन रुद्रवंशी यांचाशी फोनवरून संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात पाचारण केले.

यावेळी पोलीस ठाण्यात मोरावर उपचार करण्यात आले. त्यानंतर मोर्स वनविभागाच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा, पोलीस कर्मचारी अजय महाजन, योगेश गुंजाळ, योगेंद्र शिसोदे, निलेश पवार, जितेंद्र पवार यांनी सहकार्य केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!